शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दुष्काळग्रस्त भागातील कृषी वीजबिलात सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 1:13 PM

कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, रोजगार हमी योजनेच्या कामातील निकषांमधे शिथिलता आणण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन : जिल्ह्यात २४४ टँकर सुरू, बाधितांची संख्या चार लाखांवर शेतपंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार दुष्काळग्रस्त गावांमध्ये शाळा, महाविद्याालयीन विद्याार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

पुणे : राज्य सरकारनेदुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना कृषी पंपांच्या वीजबिलात आणि जमीन महसूलात सूट दिली जाणार असून, कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार असून, थकीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने २०१८ च्या खरीप हंगामासाठी दुष्काळ जाहीर जाहीर करण्यात आला होता. या भागातील नागरिकांसाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, रोजगार हमी योजनेच्या कामातील निकषांमधे शिथिलता आणण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी पाण्याचे टँकर, टंचाई जाहीर झालेल्या ठिकाणी शेतपंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये शाळा, महाविद्याालयीन विद्याार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई गंभीर आहे. तर, १६४ गावे, एक हजार १९१ वाड्या-वस्त्यांमधील चार लाख सहा हजार ८७४ नागरीक आणि तीन हजार १०७ जनावरे बाधित आहेत. या सर्वांना २४४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दहा चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. टँकर मागणी नोंदवही ठेवणे, टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर २४ तासांमधे त्यावर कार्यवाही करणे, टँकरवर नियंत्रणासाठी जी.पी.एस यंत्रणा बसवण्यात आली असून, त्यावर मोबाइलवरुन नियंत्रण ठेवण्यात येत आहे. टँकर भरायच्या ठिकाणी पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आणि पाण्याच्या स्वच्छतेबाबत चाचणी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली पथक नेमण्यात आले आहे.......पाणी जपून वापरा खडकवासला धरण साखळी प्रकल्पात केवळ ३.८९ अब्ज घनफूट (१३.३३ टक्के) पाणीसाठा आहे. धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांकडून दुष्काळाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, या तक्रारींची नोंद घेण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची दुष्काळ नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीसाठी नागरिकांनी ०२०-२६१२२११४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.................

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार