निमगाव केतकी : निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरातील डाळिंबपिकावर आलेला जीवघेणा रोग तेल्या तसेच डाळिंबाचा तीस ते चाळीस रुपयांवर आलेला विक्रीदर यांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.मागील वर्षाही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी तेल्या रोगाबरोबरच पाणीटंचाई आवकाळी, गारपीट, तसेच वेळोवेळी येणाऱ्या लहानमोठ्या रोगांचा सामना करताना या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी डाळींब धरलेल्या बहर आता तोडणीस आला आहे. तरीही या बागांमध्ये तेल्या रोगाचे प्रमाण आहे असेच आहे. त्यामुळे शंभर रुपऐ प्रतिकीलो जाणारी फळे या रोगाच्या प्रादुभार्वामुळे चाळीस ते पंचेचाळीस रूपाये किलोने कशीबशी विकली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा मशागतीसाठी व औषधाचाही खर्च निघने मुश्कील झाले आहे. बागेमधील फळांना तर व्यापारी खरेदी करण्यास धजवत नाहीत. (वार्ताहर)पारवडीत शेतकरी अडचणीत पारवडी : पारवडी (ता. बारामती) आणि परिसरामध्ये डाळिंबबागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पारवडी परिसरामध्ये शंभर हेक्टरच्यावर डाळींबाच्या फळबागा आहेत. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी बागेत पाणी व्यवस्थापन, औषध फवारणी, तण व्यवस्थापन, वेगवेगळी टॉनिक, सुरक्षा मशागत, औजारे, दैनंदिन देखभालीवर एकरी दीड ते दोन लाखापर्यंत खर्च केलेले आहेत. एवढा खर्च करून एकरी तीन लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित असते. परंतू, तेल्या रोगाच्या प्रादूर्भावामुळे अक्षरक्ष: उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याची खंत डाळींब उत्पादक शेतकरी राजू माळशिकार यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत कृषी सहाय्यक कुंभार यांच्याशी संपर्क केला असता हा निर्णय आम्ही घेत नसल्याचे सांगितले. -गतवर्षी गारपीटीने डाळींब बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा अवकाळी पाऊस व रोगराईमुळे डाळींब बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. माळरानावर कमी पाण्यावर येणारे पीक व हमखास पैसा देणारे पीक म्हणून डाळींबाची लागवड मोठ्या प्रमाणात तालुक्यात केली जात आहे. मात्र तेल्या रोगाच्या संकटामुळे डाळींब शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक अनुदान द्यावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आहे.
तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त
By admin | Published: June 29, 2015 11:34 PM