शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पीएमआरडीला आकार देणारे महेश झगडे यांच्या बदलीने असंतोष

By admin | Published: April 23, 2017 4:22 AM

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात धडाकेबाज काम करीत विविध योजना आखणारे मुख्य कार्यकारी

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात धडाकेबाज काम करीत विविध योजना आखणारे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे असंतोष व्यक्त होत आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, विकास आराखडा यांच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या कामाला आकार दिला होता. दोन वर्षे पूर्ण व्हायच्या आतच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तुलनेने नवीन असणाऱ्या किरण गिट्टे यांची नियुक्ती झाली आहे.राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकाने तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या पीएमआरडीएच्या स्थापनेला मंजूरी दिली.१५ मे २०१५ रोजी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या पीएमआरडीएच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा झगडे यांच्या हातात देण्यात आली.मुख्यमंत्री या प्राधीकरणाचे अध्यक्ष आहेत. झगडे यांनी पीएमआरडीएचा पदभार स्विकारला या वेळी अनेक अडचणी होत्या. साधे कार्यालयही नव्हते.कर्मचाऱ्यांची नेमणू्र झालेली नव्हती. निधीचा प्रश्न होता. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या कामासाठी निधीची कोणतीही तरतूद नव्हती.सर्वात महत्वाचे म्हणजे पीएमआरडीएचे अधिकारांबाबतही स्पष्टता नव्हती. या सगळ्यांशी सामना करीत झगडे यांनी धडाक्याने कामास सुरूवात केली.पीएमआरडीएच्या कामांना प्रचंड गती दिली. पीएमआरडीएच्या कार्यालयासाठी येरवडा येथे जागा उपलब्ध करून घेतली व कार्यालयाचे काम देखील सुरू केले. पीएमआरडीएचे कार्यत्रक्षेत्र सुरूवातीला ३ हजार ३६० चौरस किलोमीटर होते. यामध्ये वाढ करून तब्बल ६ हजार ६०० चौरस किलोमीटर झाले. या सर्व क्षेत्रांत नियोजनपूर्वक कामाचे शिवधनुष्य पेलण्याची अवघड जबाबदारी झगडे यांच्यावर होाती. त्यांनी बांधकाम परवानग्या जलद गतीने व कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी पाषाण येथे स्वतंत्र व्यवस्था सुरू केली. यामागे झगडे यांचे दूरदृष्टीपूर्वक नियोजन होते. मात्र, त्यांच्या बदलीमुळे या कामांना खिळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. झगडे यांच्या बदलीचे वृत्त आल्यावर सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आणि बांधकाम व्यावसाईकांपासून या परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत सर्व घटकांतून संताप व्यक्त होत आहे. झगडे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही धडाकेबाज काम केले होते. या वेळीही त्यांच्या बदलीनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. (प्रतिनिधी)शिवाजनगर- हिंजवडी मेट्रोचे स्वप्न!- पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर उपाययोजना करतानाच आयटी सिटीचे स्वरुपच बदलून टाकणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रकल्पाला महेश झगडे यांनी मूर्त स्वरुप दिले. यासाठी सूक्ष्म सर्वेक्षण करून अहवालही केला. संपूर्ण इलेव्हेटेड असणाऱ्या या कामासाठी शासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करतान निधीचे स्वतंत्र स्त्रोत्र उभे करण्याची योजना झगडे यांनी आखली होती. त्यांची बदली झाल्याने आता या प्रकल्पाचे काय होणार हा प्रश्न आहे. - पीएमआरडीऐच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी झगडे यांनी खास पथके तयार केली. मात्र, त्याचबरोबर बांधकाम परवान्याची प्रक्रियाही सुलभ आणि वेगवान केली. त्यामुळे या भागाचा नव्याने विकास होऊ लागला होता. तसेच पीएमआरडीए मार्फत होणाऱ्या रिंगरोडमुळे वाहतुकीचा प्रश्नही सुटणार आहे.