खडकी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खडकी गावातील तरुणांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात मोफत जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च सरपंच कृष्णा भोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस खडकी अध्यक्ष दीपक बांगर, ग्रा.पं.सदस्य नारायण बांगर, ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय बांगर, युवा नेते राजूशेठ पोखरकर, पांडुरंग पाटील, नवनाथ अनंता वाबळे, अल्ताफ इनामदार, गोकुळ बोराडे, योगेश अरगडे यांनी स्वतःच्या खर्चाने संपूर्ण गाव सॅनिटायजर केले. त्यामुळे आता गावात आज रोजी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. यापुढे योग्य ती काळजी घेऊ आणि गावात लवकरच कोविड सेंटर सुरू केले जाईल, अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, कृष्णा भोर, अशोक भोर, दीपक बांगर यांनी दिली.
खडकी गावात जंतूनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:10 AM