या दवाखान्याचा उद्देश प्राथमिक सुविधा लवकर मिळावी. सर्व प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन. मोफत वेगवेगळे कॅम्प नियोजन, शासकीय व निमशासकीय सर्व योजनांची माहिती, मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन, शस्त्रक्रियेला आर्थिक मदत मार्गदर्शन, बालरोगाची सर्व माहिती. स्त्री रोग व प्रसूतिपूर्व तपासणी, हृदयविकार, मेंदूविकार, श्वसनाचे विकार, मधुमेह सल्ला व तपासणी अशा प्रकारचे सर्व फायदे येथे मिळतील.
हडपसर परिसरातील ससाणेनगर भागात पुणे शहरातील पहिला २० रुपयांत दवाखाना सामाजिक कार्यकर्त्या स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर दवाखान्याचा शुभारंभ भाजप नगरसेवक आबा तुपे, प्रदेशाध्यक्ष भटक्या विमुक्त भाजप डॉ. उज्ज्वला हाके, हडपसर मेडिकल असो.चे डॉ. मंगेश वाघ, डॉ. बाळासाहेब हरपळे, शशिकला वाघमारे, प्रीती व्हिक्टर, प्रमोद सातव, संतोष शिंदे पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन स्मिता गायकवाड, तुषार गायकवाड, रोहित बोरकर, दर्शना डाके, आशा भुमकर, पूजा मोरे, सागर पवार, अमोल भुजबळ, रत्नमाला गायकवाड, प्रभावती भूमकर, शर्मिला डांगमाळी उपस्थित होते.