याप्रसंगी सरपंच विद्या मोहिते, मंडल अधिकारी विजय घुगे, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी राहुल पाटील, कृषिमित्र अंकुश दौंडकर आदी शेतकरी उपस्थित होते.
खरीप व रब्बी हंगामातील पाच पिकांना द्यावयाच्या खताच्या हेक्टरी व एकरी मात्रा नमूद करण्यात याव्यात. गावाचे कोरडवाहू क्षेत्रात दहा हेक्टरला एक आणि बागायत क्षेत्रात अडीच हेक्टरला एक माती नमुना घेणे, नमुना काढताना जीपीएसचा वापर करणे, शेतक-यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षण करणे, माती तपासण्याची सुविधा मोफत देण्यात येणार आहे. यादवारे जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फूरद, पालाश, जस्त, तांबे, लोह, मंगल, सोडियम, मुक्त चुना इ. घटक तपासण्यात येतील अशी माहिती मंडल कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे यांनी दिली.
माती नमुना घेताना इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा काढून माती बाहेर टाकावी, खड्ड्याच्या कडेची माती घ्यावी. यापद्धतीने ४ ठिकाणची माती गोळा करावी. त्याचे समान ४ भाग करावे. समोरासमोरील २ भागांची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. माती अेाली असल्यास ती सावलीत वाळवावी. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत प्रतितालुका निवडलेल्या १० गावांत प्रदर्शितमध्ये शेलपिंपळगावची निवड करण्यात आली आहे, हे कृषी सहायक मंगेश किर्वे यांनी सांगितले.
२१ शेलपिंपळगाव जमीन सुपिकता
शेलपिंपळगाव येथे जमिनीची सुपिकता तपासून त्याचा निर्देशांकाचा फलक लावताना अधिकारी व इतर.