शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आडसाली उसाच्या तोडी लांबल्या

By admin | Published: December 25, 2015 1:49 AM

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. वेळेत या उसाची तोडणी न झाल्यास साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरात कारखान्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दौंड तालुक्याचा पूर्व भागात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होत आहे. या पाण्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. त्यामुळे या भागाला उसाचे आगर समजले जाते. या भागाचे अर्थकारणच उसाच्या पिकावर अवलंबून आहे. राजेगाव गटात राजेगाव, मलठण, खानवटे, वाटलूज व नायगाव या गावांचा समावेश होतो. दर वर्षी या राजेगाव गटात सर्वसाधारणपणे १२५ ते १५० ऊसतोड करणाऱ्या टोळ्या असतात; परंतु या हंगामात फक्त ४० ते ५० एवढ्याच टोळ्या आहेत. राजेगाव परिसरात सध्या भीमा-पाटसच्या ७, बारामती अ‍ॅग्रोच्या ४, दौंड शुगरच्या २७, अंबालिकाच्या ३, कर्मयोगी (इंदापूर)च्या २ टोळ्या अशा एकूण ४३ टोळ्याच कार्यरत आहेत. त्यामुळे मजुरांअभावी १८ महिने झालेल्या आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. राजेगाव परिसरातील गावांना भीमा नदीचा किनारा लाभलेला असल्याने उजनी बॅकवॉटरचा फायदा होतो; त्यामुळे या भागात पाणी भरपूर आहे, असे समजून या भागात सर्वच कारखान्यांनी जाणीवपूर्वक टोळ्या कमी टाकलेल्या आहेत, असे एका कारखाना कामगारांनी सांगितले. परंतु, या गावातील ५० टक्के शेती ही खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे, तसेच या भागात झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका यांचे जलस्रोत आटू लागल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने ऊस जळू लागला आहे. सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड केलेली आहे त्या उसाला आता जवळजवळ १८ महिने होत आले आहेत. त्यातच पाणी कमी पडू लागल्याने ऊस जळू लागल्याने उसाच्या फुकाऱ्या होऊ लागल्या आहेत.