शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
5
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
6
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
7
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
8
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
9
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
10
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
11
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
12
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
13
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
14
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
15
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
16
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
17
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
19
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 10:05 AM

सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते

जेजुरी : २०२४ शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून देण्याबाबत आदेश आहे. मात्र, सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते. स्थानिक ठेकेदाराऐवजी बाहेरील ठेकेदाराने पूर्ण तालुक्यात एकत्रितरीत्या निकृष्ट गणवेश पुरवले होते.

मात्र शासन आदेशात ठेकेदारांकडून रेडिमेड गणवेश घेण्याबाबत आदेश नाहीत. त्यामुळे शासन आदेशाची पायमल्ली होऊन स्थानिक महिला बचत गटांना रोजगार मिळणार नाही. म्हणून सदर निकृष्ट गणवेशाचे वाटप पुरंदर तालुक्यात करण्यात येत नव्हते. मात्र सध्या पुरंदरमधील सर्व शाळांमध्ये निकृष्ट गणवेशाचेच वाटप केले आहे. सदर गणवेशाचे कापड खराब असून शिलाई सहजपणे उसवत आहे.कापड फाटत आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश मिळालेले नाहीत. सदरचे दर्जाहीन खराब गणवेश पुरंदरमधील विद्यार्थ्यांना दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पुरंदरमध्ये निकृष्ट गणवेशाचे वाटप झाले असून काय आहे योजना? गणवेशासाठी राज्यस्तरावरून उत्कृष्ट कापड मिळणार होते.सदर कापडाचे तालुकास्तरीय समितीने काळजीपूर्वक तपासणी करून स्थानिक महिला बचत गटांमार्फत गणवेशाची उत्कृष्ट शिलाई करून घेण्याबाबत शासन आदेश आहे.

मात्र शासन आदेशाची पायमल्ली करुन तालुक्याच्या बाहेरील ठेकेदाराकडून अधिकाराचा दुरुपयोग करून निकृष्ट गणवेश वाटप करण्यामागे 'अर्थकारण' असल्याचा संशय आहे. महिला बचत गट कारागिरांचा रोजगार हिरावल्याचा संताप व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे स्थानिक महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

'सदर गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी शिलाई करून प्रत्येक तालुक्याला वाटप केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातून गणवेशवाटप केले होते. वारंवार मागणी करूनही गणवेश प्राप्त होत नव्हते. खूप उशिरा गणवेश मिळाले असून ते व्यवस्थित न शिवलेले, मापात न बसणारे, फाटलेले असे गणवेश असतील तर ते बदलून घेण्याचा पाठपुरावा केला जाईल. केंद्रप्रमुखांमार्फत तशा सूचना शाळांना दिल्या आहेत.  - संजय जाधव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पुरंदर

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रssc examदहावीEducationशिक्षणTeacherशिक्षक