कोरेगाव - भीमा येथील हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी आंबेडकरी संघटना, डावे पक्ष व संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्र ठप्प झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. वाहनांची जाळपोळ, गाड्या व दुकानांची तोडफोड झाली. मुंबईत लोकल सेवा प्रभावित झाली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात एसटी बंद ठेवण्यात आली होती. स्कूलबस बंद होत्या, त्यामुळे काही संस्थांनी शाळांना स्वत:हून सुटी दिली. दुपारी चारला बंद मागे घेण्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले.सोलापूर : नरसय्या आडम ताब्यातसोलापूरमध्ये बंद ठेवण्यासाठी आवाहन करणाºया माजी आ. नरसय्या आडमसह ३० कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. बससेवा बंद होती, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पोलिसांनी शहरात ८५ तरुणांना ताब्यात घेतले.नाशिक: दगडफेकीत एक जखमीनाशिकरोडजवळ विहितगाव येथे दगडफेकीत एक जण जखमी झाला. आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक्का जाम आंदोलन केले. लासलगाव येथे बस पेटवण्याचा प्रयत्न झाला. जिल्ह्यात २१ ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी दिली. 'पुणे : एकबोटेंच्या घरासमोर बंदोबस्तपुण्यात मध्य वस्तीतील जवळपास सर्व व्यवहार बंद होते़ शहरात ७० छोटे मोठे मोर्च काढण्यात आले़ आंदोलकांनी ५५ बस फोडल्या.कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या शिवाजीनगरमधील घराबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता़ गाड्यांवरून गटाने फिरणारे तरुण त्यांच्या घराजवळून जाताना घोषणाबाजी करीत होते़शाळांचे बस चालक, रिक्षाचालक यांनी बंद पाळला. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाहीत. खासगी संस्थांनी स्वत:हून शाळा बंद ठेवल्या. महाविद्यालयांमध्येही तुरळक उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवडच्या चौकात कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पिंपरी, चिंचवड आणि निगडीत वाहनांवर किरकोळ दगडफेक झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. बंदोबस्तावरील पोलीस महेंद्र गायकवाड चक्कर येऊन पडले.एकजुटीचा नाराकायम ठेवा - आठवलेआंबेडकरी जनतेने स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जय भीमच्या एकजुटीचा हा नारा कायम ठेवा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपाइंच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाणे, तहसील कार्यालयांसमोर निदर्शने, धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबईतील निषेध आंदोलनात रिपाइं कार्यकर्ते आघाडीवर होते, असा दावा पक्षाने केला आहे.मराठवाडा लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घटकचाचणीचा पेपर देण्यासाठी जाणाºया योगेश प्रल्हाद जाधव (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याला आंदोलनकर्ता समजून शीघ्रगती कृती दलाच्या जवानांनी बेदम मारहाण केली़ त्यात त्याचा मृत्यू झाला़ जवानांनी दिसेल त्यास लाठीमार केला. योगेशच्या मानेवर तसेच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़ त्यानंतर जमावाने तीन दुचाकी पेटविल्या.लातुरला १०पोलीस जखमीलातूर जिल्ह्यात निलंगा शहरात संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केली. पोलीस आणि जमावात बाचाबाची झाली. त्यातून झालेल्या दगडफेकीत दहा पोलीस व काही नागरिक जखमी झाले.औरंगाबादला तीन ठिकाणी दगडफेक झाली. पोलिसांनी संवेदनशील भागामध्ये कोम्बिंग आॅपरेशन केले. दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्तांसह २५ पोलीस अधिकारी, कर्मचारी किरकोळ जखमी झाले.अहमदनगर: दूध रस्त्यावर ओतलेअहमदनगर : शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. एस.टी.सह खासगी वाहनेही बंद होती. शहरात भारिप बहुजन महासंघ आणि संभाजी ब्रिगेडने एकत्रित रास्ता रोको केला. जवळा गावात क्रांती ज्योती दूध संघावर दगडफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या. जमावाने दूध ओतून दिले. पोलिसांनी जिल्ह्यात ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल के ला.खान्देश : १५० जणांवर गुन्हे दाखलजळगाव : जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड झाली. जळगाव जिल्ह्यात २२, तर धुळे जिल्ह्यात सात जण ताब्यात घेतले. यावल येथे आंदोलकांनी साने गुरुजी विद्यालयातील स्रेहसंमेलन बंद पाडले. खुर्च्यांची मोडतोड केली. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तिन्ही जिल्ह्यात सुमारे १५० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
असंतोषाचा भडका, कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 4:13 AM