पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक सेल च्या पुणे शहर अध्यक्षपदी गिरीश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, अदिती तटकरे, बाबा पाटील यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आले. या वेळी सांस्कृतिक सेलचे इतर पदाधिकारी, मेघा घाडगे, चैत्राली रोडे, संकेत शिंदे उपस्थित होत.
--------------------
मंडळांना कंपोस्ट खताचे वाटप
पुणे : जागतिक किसन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटना कसबा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उत्सव गणेशोत्सव काळात राबविला होता. त्यात संस्थांनी गोळा केलेले निर्माल्यापासून तयार केलेले कंपोस्टखत प्रसाद म्हणून पुन्हा 200 गणेशोत्सव मंडळांस वाटप उपक्रम २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. राजेंद्र नगर येथील इंद्रधनुष्य पर्यावरण सभागृहात हा उपक्रम होणार असून, या वेळी माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, डॉ. जितेंद्र संगेवार आदी उपस्थित राहतील.