माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये
माळशिरसमध्ये झालेल्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. येणारी तिसरी लाट व घेण्यात येणारे विविध शिबिरे त्यांचे नियोजन, नवीन इमारतीचा पाठपुरावा, सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य केंद्रातील होणारे लसीकरण, आरोग्य केंद्राच्या समोरील मंडप, आरोग्य सेविकांच्या अडचणी, आशा सेविकांच्या विविध समस्या, इत्यादी गोष्टींचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश जगताप, पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. विवेक आबनावे,
माळशिरस आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणारे दहा उपकेंद्रांतील सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.
माळशिरस आरोग्य केंद्रात संगणक वाटप करताना जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे व इतर.