या वेळी माजी आमदार रंजना कुल, भाजपा जिल्हाध्यक्ष कांचन कुल, तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, शशिकांत ईरवाडकर, डॉ. सुरेखा पोळ, धनाजी शेळके, संजय ईनामके, सुखदेव चोरमले, कैलास खेडेकर, अरुण भागवत, डॉ. सचिन भांडवलकर, संजय ईनामके, हरिश्चंद्र ठोंबरे, तुकाराम ताकवणे, आबासाहेब खळदकर, चंद्रकांत नातू, गोरख दिवेकर, अशोक रासगे, अनिल शितोळे, आबासाहेब चोरमले उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले की, स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांनी केलेली कालव्याची अंदाजपत्रके आज पूर्ण होत आहेत. सुभाष अण्णा यांच्याकडे पाण्यासंदर्भात दूरदृष्टी होती. तालुक्यातील सर्व कामे करण्यास आपण कटिबद्ध असून गेल्या सहा वर्षांपासून आपण आरोग्य क्षेत्रातही भरीव काम केले. येत्या आठवड्यात ८३ लोकांना तीनचाकी सायकल देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असून डी. एस. लाेणकर, शलाका लोणकर यांच्या वतीने महिनाभर मोफत अॅन्जोप्लास्टी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या भीमा पाटसबद्दल बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून दोन दिवस मी मुंबई किंवा दिल्लीला असतो.भीमा पाटस सुरू करण्यासंदर्भात माझे प्रयत्न चालू असून काम अंतिम टप्प्यात आले आहे.
भीमा पाटसचे संचालक विकास शेलार म्हणाले की,चौफुला येथील डेडिकेट कोविड सेंटरच्या माध्यमातून आजतागायत एक हजार ५० रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यासाठी आमदार राहुल कुल व संपूर्ण टीमने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
यावेळी डॉ. संग्राम डांगे, डॉ. दीपक जाधव, दिनेश गडधे यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास विद्या मंदिर राहू येथे सुभाष अण्णांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
०४ केडगाव पुरस्कार
सुभाष (अण्णा) कुल यांच्या प्रतिमेचे पूजन करताना रंजना कुल, राहुल कुल व इतर.