--
इंदापूर : सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ( दि. १ जून ) रोजी युवा उद्योजक सौरभ शिंदे यांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित सर्व रुग्णांना, मोफत ड्रायफ्रूटचे वाटप केले. श्रीराज भरणेेे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौरभ शिंदे म्हणाले की, कोरोना महामारी मध्ये तमाम गोरगरीब समाज आपले कुटुंब आहे. याची शिकवण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची सातत्याने असल्यामुळे, कोरोना आजार सुरू झाल्यापासून एक वर्ष मोफत मास्क शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, इंदापूर शहरातील नागरिक यांना देण्यात आली. यामुळे वाढणारी महामारी रोखण्यासाठी छोटीशी मदत झाली. इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित जे रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यांना शिंदे परिवाराच्या वतीने ड्रायफ्रूट राज्यमंत्री भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करत आहोत. कोरोना महामारी संपताच मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबिवणार असल्याची माहिती सौरभ शिंदे यांनी दिली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, तसेच आशिष बधे, शुभम नलवडे, प्रीतम भालेराव, अझहर पटेल, अभिषेक चव्हाण, विनायक शिंदे, ओंकार शेलार उपस्थित होते तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृता सौरभ शिंदे तसेेच बधे परिवाराने परिश्रम घेतले.
--
फोटो
फोटो ओळ : इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांना ड्रायफ्रूटचे वाटप करताना युवा नेते श्रीराज भरणे व उद्योजक सौरभ शिंदे व इतर मान्यवर.
टीप : सदर बातमीची आज पावपान जाहिरात होती तरी बातमी फोटोसह सविस्तर प्रसिद्ध करण्यात यावी.