ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहावे, शिक्षणापासून वंचित राहू नयेत, शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून दूर जाऊ नयेत म्हणून प्रयास भारत संस्था, पिंपरी चिंचवड, पुणेच्या वतीने विद्यालयातील गरीब, गरजू आणि आदिवासी भागातून येणाऱ्या ४०० विद्यार्थ्यांना फूलस्केप वही, कंपास पेटी आणि दफ्तर या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली ६ वर्षे हा उपक्रम ही संस्था विद्यालयात राबवित आहे.
याप्रसंगी ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रयास भारत संस्था, पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी ह.भ.प. सर्जेराव महाराज गाढवे, गाडगे महाराज मिशनचे संचालक नितीन पाटील, सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, बबन डुंबरे, ब्रम्हदेव घोडके आदी उपस्थित होते.