वेल्हे तालुक्यातील विंझर येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप सरपंच विनायक लिम्हण, माजी सरपंच संभाजी भोसले, सतीश लिम्हण,यांच्या हस्ते करण्यात आले.
वेल्हे तालुक्यात प्रथम, एडुको संस्था तालुक्यातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने काम करीत असुन येथील १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य असलेली बॅग देण्यात आली. तर येथील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढावी यासाठी लायब्ररी किट देखील देण्यात आले. यावेळी विनायक लिम्हण, संभाजी भोसले, सतीश लिम्हण, उपसरपंच राहुल सागर, सोसायटीचे चेअरमन शिवाजी सोनवणे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रवी लिम्हण, ग्रामपंचायत सदस्य नुतन गायकवाड, मोनिका गायकवाड, शिवाजी सागर, दत्ता चोरघे, बाजीराव भोसले, गणेश भोसले आणि प्रथम संस्थेचे किरण भोसले, अमोल लिम्हण, मनोज पंडीत, सागर भोसले उपस्थित होते
विंझर प्रथम संस्थेकडुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले.