कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. तरीही काही लोकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उंच डोंगराची चढण चढत शिवलिंगाचे दर्शन घेतले.यावेळी वासुली येथील शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाचपुते यांनी स्वर्गीय काळूरामअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने जे काही भाविक उपस्थितीत होते. त्यांना उपवासाच्या निमित्ताने केळी व खिचडी वाटप करण्यात आली.
भीमाशंकरप्रमाणे भामचंद्र डोंगरावर महादेवाचे पुरातन व शिवलिंग आहे. शिवरात्रीला व श्रावण महिन्यात येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या अलोट गर्दी लोटत असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी गर्दी केली नाही. युवा उद्योजक चेतन पाचपुते, रामेश्वर पारेख, युवराज पानमंद, अर्जुन पानमंद आदींनी भाविकांची व्यवस्था केली.
११ आंबेठाण
भामचंद्र डोंगर येथे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.