महामार्ग पोलीस मदत केंद्र आळेफाटा अंतर्गत सर्व मृत्युंजय दूत सदस्यांना प्रथम उपचार कसे करावेत याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले, असे आळेफाटा पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी सांगितले असून त्या अंतर्गत हायवेवरील विविध गावातील नियुक्त मृत्युजंय दूत यांना पंधरा स्ट्रेचर व २० प्रथम उपचार किट विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी उपलब्ध करून दिले. याप्रसंगी मृत्युंजय दूत दिलीप धुमाळ, अशोक राक्षे, दिलीप पवळे, सरफराज तांबोळी आणि तुषार तोडकर यांना साहित्य देण्यात आले. याप्रसंगी पोलीस जवान दादासाहेब मोशे, बी. एस. वायाळ, अरुण उबाळे, जयवंत कोरडे, संदीप सोमवंशी, उत्तम वाजे, हारून तांबोळी, गोरख माळी आदी उपस्थित होते.
०७मंचर
मृत्युंजय दूत यांना स्ट्रेचर आणि फर्स्ट एड बॉक्सचे वाटप करताना पोलीस अधिकारी आणि जवान.