भांडगाव येथील ५० गरजू महिलांना विटगन कंपनीच्या सीएसआर फंडातून पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले.
भांडगाव ग्रामपंचायत कार्यालयात पीठ गिरणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष स्थानी दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे होते. या वेळी माजी उपसभापती नितीन दोरगे, सरपंच संतोष दोरगे, उपसरपंच रुपाली खळदकर, ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण काटकर, ग्रामविकास अधिकारी आर. एस. जगताप, विटगन कंपनीचे अधिकारी निना निकम, संग्राम फटांगरे , अमोल देशमुख , सुहास इनामदार , शौकत शेख , अजित कदम , रोटरी क्लब पुणेच्या अध्यक्षा मीना बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
विटगन कंपनीने यापूर्वी गावातील ग्रामस्थांना कोरोना काळात धान्य किट, १४०० आरोग्य किट , प्राथमिक शाळेसाठी पाच संगणक इत्यादी साहित्याचे वाटप केले आहे.तर रोटरी क्लब यांचे वतीने गाव तलावाचे खोलीकरण , गाळ काढणे आदी कामे करण्यात आली आहेत. यामुळे गावाच्या विकासाला हातभार लागला असल्याचे उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगितले. सूत्रसंचालन अमित दोरगे, तर आभार राहुल खळदकर यांनी मानले.
भांडगाव येथे ५० गरजू महिलांना पीठ गिरण्यांचे वाटप करताना मान्यवर.