पुणे : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान वाटप योजनेअंतर्गत शिरूर तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीसाठीच्या ९५३ लाभार्थ्यांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले. सोबतच त्यांच्या बँक खात्यात २ हजारांची रोख रक्कमही जमा करण्यात आली आहे. कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते पंचायत समिती येथे खावटी वाटप योजनेचा शुभारंभ झाला.
शिरूर व शिरूर परिसर गटात २३९, रांजणगाव गणपती गटात ३३, तळेगाव ढमढेरे गटात ६७, कोरेगाव - भीमा गटात १५, पाबळ गटात ४२, मलठण गटात ६८, टाकळीहाजी गटात १६४, वडगाव रासाई गटात २५४, न्हावरा गटात ६७ याप्रमाणे संपूर्ण शिरूर तालुक्यात ९५३ किटचे वाटप करण्यात आले. किराणा ,कडधान्य इतर जीवनावश्यक वस्तू किटमध्ये होत्या. यावेळी शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविबापू काळे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, वंचित विकास संस्था यांची टिम उपस्थित होते.