एक हात मदतीचा : आशा प्रतिष्ठानचा कोरोनात पुढाकार
पुणे : आगळंबे (ता. हवेली) येथील डोंगरी भागात राहणाऱ्या धनगर समाजाच्या गरीब आणि गरजूंना, तसेच मुळशी तालुक्यातील मुठा, लवार्डे, टेमघर, कोळावडे या गावांतील गरजू महिलांना मोफत धान्य किट वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या काळात एकमेकांना जमेल ती मदत केली पाहिजे याच हेतूने ही मदत करण्यात आली. आगळंबेचे सरपंच विलास वांजळे, मुख्याध्यापक पवार सर, शरद पारगे, दत्ता ठाकर, संतोष महाराज चांदेकर, अंकुश पारगे, बबन ठाकर, कुमार पोटे, संतोष खरात उपस्थित होते. सचिव चंदन डाबी यांनी प्रास्ताविक, तर उपाध्यक्ष गणेश ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम डांगी यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष प्रतीक डांगी, सोपान यादव आणि कुलकर्णी गुरुजी यावेळी उपस्थित होते.
फोटो : आशा प्रतिष्ठानच्या वतीने हवेली एक आणि मुळशी तालुक्यातील चार गावांत मोफत अन्न-धान्य वाटप करण्यात आले.