आंबोडी येथील माया केअर वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. भाटे दाम्पत्य वृद्धांची सेवा करत आहेत. आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात वृद्धांना आधाराची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचे या पुढील वाढदिवस आंबोडी येथील वृद्धांसोबतच साजरे करणार आहेत. तसेच या वृद्धाश्रमासाठी लागणारी सर्व मदत करण्याची तयारी शिवम बिल्डसचे ॲड. नितीन कुंजीर व सर्व कार्यकर्त्यांनी दाखवली.
या वेळी शिवसेना नेते मनोज कुंजीर, वाघापूरचे माजी उपसरपंच प्रवीण कुंजीर, पाणलोट समिती अध्यक्ष रामदास कुंजीर, सूरज कुंजीर, अनिकेत कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे, शिवसेना अध्यक्ष विक्रांत पवार, संतोष खेडेकर उपस्थित होते.
२९ भुलेश्वर
पुरंदर शिवसैनिकांच्या वतीने वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात आले.