जुन्नर तालुक्यात आयटी केंद्र उभारावे
अनंतराव चौगुले
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व पुणे येथील स्व. विलासराव तांबे फाउंडेशन यांच्या वतीने स्व. शिक्षण महर्षी विलासराव तांबे यांच्या ७४ वी जयंती उत्सवानिमित्त देण्यात येणाऱ्या ज्ञानविलास गौरव पुरस्काराचे वितरण थाटात झाले.
अध्यक्षस्थानी आळेफाटा येथील जनमंगल पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव चौगुले होते. या वेळी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, मंडळाचे मानद सचिव वैभव तांबे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, संचालिका नीलम तांबे, नलिनी गुलाब डुंबरे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, बाळासाहेब डुंबरे, रामनाथ मेहेर उपस्थित होते
ज्ञानविलास गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, त्यात चैतन्य बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर प़ोपट डुंबरे, पत्रकार भरत अवचट आणि स्व. गुलाबराव अण्णा डुंबरे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, त्यांच्या नातेवाईकांना पुरस्कार स्वीकारला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुविलास गाढवे, विक्रम अवचट, धनंजय डुंबरे, ढमाले, मयूर ढमाले, माजी प्राचार्या मंगल तांबे, ढमाले इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. जी. यू. खरात, फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश दामा, मा.पोलीस अधिकारी वसंत तांबे उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष विशालशेठ तांबे यांनी केले. आभार उपाध्यक्ष श्रीहरी तांबे यांनी मानले
--
०२ओतूर ज्ञानविलास गौरव पुरस्कार
ज्ञानविलास गौरव पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुरस्कार्थी व पाहुणे