राजगुरुनगर एसटी आगारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली एसटी महामंडळाची सेवा हळूहळू सुरळीत होत आहे. या किटमध्ये सॅनिटायझर, मास्क, हेल्मेट, हॅन्डवॉश, गरम पाणी राहणारी स्टील बाटली, साबण, वाफेचे मशीन, प्रवासी बॅग आदी साहित्य आहे. या वेळी हेल्पेज इंडियाचे अध्यक्ष राजीव कुलकर्णी, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, बिलकेअर कंपनीचे ऋषिकेश राजवाडे, महेंद्रा कंपनीचे अधिकारी शिवाजी वाणी, आगार व्यवस्थापक शिवकन्या थोरात, आगार लेखाकार हिरामण दिघे, कार्यशाळा अधीक्षक गौरव काळे, वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव रमेश वाडेकर, दत्तात्रय गभाले, गुलाब तिटकारे, नीलेश सातकर, राजेंद्र पवार, अमित जगताप, महादेव तुळसे, सतीश दळवी, शरद साबळे, नागेश्वर वैरागर, कांताराम गभाले, भास्कर म्हसे ,भारत वाबळे, माणिक थिगळे, अर्जुन वाघुले उपस्थित होते.
१्० राजगुरुनगर वाटप
राजगुरुनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांकरिता कोरोना प्रतिबंधक किट वाटप करण्यात आले.