उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस आणि कै. बबनराव हांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्तच्या निमित्ताने या वेळी कै. साहेबराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रोगप्रतिकारक होमिओपॅथी औषधांच्या एक लाख रुपये किमतीच्या एक हजार बाटल्या रुग्णांना देण्यात आल्या. या शिबिरामध्ये ५०० रुग्णांची मोफत रक्त, लघवी, डोळे शरीर तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ रुग्णांची बारामती येथील गिरीराज हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी सर्जरी होणार आहे.
या वेळी बारामती डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर वंदना मोहिते म्हणाल्या की, कोरोना काळामध्ये आमदार नीलेश लंके यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगभर घेतली गेली. सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या महिन्यामध्ये केडगाव येथे आम्ही घेतलेल्या रोगनिदान शिबिरामध्ये आमदार लंके यांनी भेट दिली. शिबिरामध्ये सुमरे वीस डॉक्टरांच्या टीमने काम केले.
--
फोटो ओळी : १० केडगाव होमिओपॅथी औषधे वाटप
फोटो ओळी : पारनेर तालुका दौंड येथे मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने औषधाचे वाटप करताना आमदार नीलेश लंके, डॉक्टर वंदना मोहिते.