या वेळी येथील सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्या हस्ते २५ शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, रासायनिक खतातून १० टक्के बचत, बी. बी. एफ पेरणी, हुमणी नियंत्रण आणि फळबाग लागवड आदी विषयांवर कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. चांदगुडे, कृषी सहायक एस. टी. जायपत्रे तसेच योगेश जगताप, गोविंद बाचकर, सुनील जगताप, दत्तात्रय ढोपरे, शांताराम ढोपरे, आप्पासो लव्हे तसेच प्रात्यक्षिकासाठी निवड केलेले शेतकरी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १६सुपे बाबुर्डीत बियाणे वाटप
फोटो : बाबुर्डीत शेतकऱ्यांना बांधावरच बाजरी बियाण्याचे वाटप करताना कृषी विभागाचे अधिकारी व इतर.