पुणे: चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. हा निधी प्रत्यक्ष मिळण्यासाठी काही दिवस लांगतील. परंतु आत निधी मिळण्याची वाट न पाहता महापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना येत्या दोन दिवसांत वाटप सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मागील वर्षी आॅगस्ट २०१७ मध्ये चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने या पुलाचे काम भूमिपूजनानंतर एक वर्षे झाले सुरू होऊ शकलेले नाही. यासाठी किमान ८० टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, अशी भूमिका महामार्ग प्राधिकरणाने घेतली होती. पुणे महापालिकेने भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधी बाबत असमर्थता दाखवल्याने राज्य शासनाने यासाठी मदत करावी, असा प्रयत्न महापालिका व लोकप्रतिनिधी केला. महापालिकेच्या मागणील मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु नगरविकास खात्याने एकूण मागणीच्या ५० टक्केच निधी द्यावा, असा प्रस्ताव दिला. यामुळे पुन्हा महापालिकेची अडचण निर्माण झाली. परंतु पुणे महापालिकेला शंभर टक्के निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पुणे महापालिकेला चांदणी चौक उड्डाणपुलासाठी १८६ कोटी रुपये देण्याचे अखेर मान्य केले. याबाबत राव यांनी सांगितले की, शासनाने निधी मंजूर केल्याचा अंतिम आदेश दिला आहे. परंतु, प्रत्येक्ष महापालिकेला हा निधी मिळण्यासाठी काही दिवस जातील. निधी अभावी तब्बल एक वर्ष भूसंपादनाचे काम रखडले आहे. वाहतुकीची समस्या लक्षात घेता आणखी वेळ घालवणे चुकीचे ठरेल. त्यामुळे आता तातडीने महापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पैसे वाटप व भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येईल.
चांदणी चौक उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचे दोन दिवसांत पैसे वाटप : सौरभ राव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 8:22 PM
चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.
ठळक मुद्देमहापालिकेच्या निधीतून बांधित लोकांना येत्या दोन दिवसांत वाटप सुरु करण्यात येणार पैसे वाटप व भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरु