कोंढुर येथील विद्यालयासाठी रोटरी क्लबने विज्ञान प्रयोगशाळा उभारून साहित्य दिले आहे. संगणक कक्षाचेही बांधकाम करून संगणकांसहित सुसज्ज प्रयोगशाळा उभारली आहे. शिक्षक व मुलांसाठी शौचालय, ई-लर्निंगचे दोन संच, विज्ञान प्रयोगशाळा व ग्रंथालयासाठी प्रत्येकी तीन कपाटे, कार्यालयासाठी कपाट, यंत्राचा इन्व्हर्टर, पाणी शुद्धीकरण संच, यंत्राचा संच, ध्वनिक्षेपक संच, खुर्च्या, बेंचेस आदी साहित्यांची मदत केली.
साहित्य हस्तांतरण काँग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या हस्ते केले. रोटरी क्लबचे रवी धोत्रे, कल्याणी गोखले, माजी सभापती राधिका कोंढरे, सरपंच सारिका कुडले, अमृतेश्वर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, संचालक तानाजी शिंदे, विठ्ठल हाळंदे, सुरेश दिघे उपस्थित होते. रवी धोत्रे व महादेव कोंढरे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र कोंढरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. सरपंच सारिका कुडले यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कोंढूर येथील अमृतेश्वर शिक्षण संस्थेला पुणे येथील रोटरी क्लब ऑफ वेस्टकडून दहा लाखांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.