साकुर्डे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बी. एम. काळे यांच्या हस्ते ती उपकेंद्राकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी बजरंग चोरमले, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर, पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे मानद सचिव गणेश कामठे, साकुर्डे उपकेंद्राच्या आशा वर्कर वनिता लोंढे, मदतनीस आशा भंडलकर ,दीपाली चव्हाण आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुका शिक्षक समिती सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असते, कोरोनाकाळातही शिक्षकांनी भरीव योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शिक्षक समितीने पुढाकार घेऊन विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही मदत गावोगावी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे अनिल चाचर यांनी सांगितले. त्यांनी आज दिलेले हे दहा किलो क्षमतेची ऑक्सिजन मशीन गावातील सर्वसामान्य जनतेचे प्राण वाचविण्यात साठी उपयुक्त ठरेल असा विश्वास बी. एम. काळे यांनी व्यक्त केला.
साकुर्डे उपकेंद्रात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करताना मान्यवर.