टाकळी हाजी येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून टाकळी हाजी, वडनेर, चांडोह, डोंगरगण, निमगाव दुडे, माळवाडी, रावडेवाडी, फाकटे, म्हसे, साबळेवाडी या दहा सोसायट्यांमधील एक हजार १५० शेतकऱ्यांना सुमारे एक हजार ६९० हेक्टर खरीप पिकांसाठी १२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. हे पीककर्ज तीन लाख रुपयांपर्यन्त शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होते .शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅकेचे शाखा अधिकारी राजेंद्र चाटे, विकास अधिकारी मनोज बोखारे, तसेच संस्थेचे सचिव गणेश हिलाल, किशोर पडवळ, देवराम गुलदगड, राजेंद्र राजगुरु, कुशाभाऊ जोर, ईश्वर राजगुरू यांनी चांगल्या पदधतीने नियोजन करीत १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यन्त वाटप करण्यात आले .
सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनोकाळात गर्दी न होऊ देता वेळेत पीककर्ज वितरण पूर्ण केल्याबद्दल जिल्हा बॅकेचे संचालक माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कौतुक केले.