चंदननगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त माजी नगरसेविका उषा कळमकर यांनी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात वडगाव शेरी, चंदननगर, खराडी परिसरातील १६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
मोठ्या गटात दीक्षा गर्जे व छोट्या गटात सई नानेकर यांचा प्रथम क्रमांक आला. तसेच, मोठ्या गटात दुसरा क्रमांक पियूशा कुलकर्णी तर तिसरा क्रमांक वैष्णवी माने यांचा आला, छोट्या गटात दुसरा क्रमांक मनस्वी मंगेश पवार, तर तिसरा क्रमांक सिद्धी हंबीरचा आला. स्पर्धेत दोन्ही गटांत एकूण ३-३ क्रमांक काढले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजेत्यांना आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते घरी जाऊन बक्षीस दिले. प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक बक्षीस दिले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार अनुसरूनच जीवनाची वाटचाल केल्यास कुठलीच गोष्ट अशक्य व अवघड वाटणार नाही, असे माजी नगरसेविका उषा कळमकर म्हणाल्या.
यावेळी प्रशांत कळमकर, रमेश कावरे, किशोर व्हावळ, श्री ओझा, मोहित फराटे, राहुल मोहिते, रवि कळमकर, स्वप्नील धावडे, प्रवीण मोहारे, अमित सुक्रे, सागर नरसाळे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वप्नील धावडे व रवींद्र कळमकर यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ:-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिससाचे वाटप करताना मान्यवर.
(फोटो - चंदननगर वक्तृत्व स्पर्धा नावाने आहे)