तळेगाव ढमढेरे येथे शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेश ढमढेरे, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुळे अडचणीत असणाऱ्या गरजू नाभिक, कुंभार व इतर समाजाला तब्बल ५१ रेशन किटचे वाटप श्री संतसेना महाराज मंदिरात करण्यात आले. शिरूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संकेत सर्जेराव गवारे, शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन पंडित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गोरक्षनाथ महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ पुणे विभागाचे कार्याध्यक्ष पी.बी. युवा कार्यकर्ते विराज गवारे,सार्थक गवारे,वेदांत गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
१५ तळेगाव ढमढेरे वाटप
गरजूंना किराणा साहित्य वाटप करताना संकेत गवारे व सचिन पंडित इतर मान्यवर.