या वेळी दौंड पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवने , सरपंच गौरी लडकत , पर्यवेक्षिका के.बी.चव्हाण , अंगणवाडी सेविका सुरेखा वाघमोडे उपस्थित होते.
पर्यवेक्षिका के. बी. चव्हाण यांनी यावेळी योजनेची माहिती दिली. एक किंवा दोन मुली झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या करून घेणाऱ्या दाम्पत्याला ही योजना शासनाने सुरू केली आहे.
लिंग निवडीसाठी प्रतिबंध व्हावा, मुलींचे आरोग्य व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेची निर्मिती झाली आहे. योजने अंतर्गत मुलींच्या नावे रक्कम शासनाद्वारे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवली जाते. मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर रक्कम मुद्दल व व्याजसह मुलीला मिळते असेही सांगितले. उपसभापती सयाजी ताकवने यांनी देखील यावेळी उपस्थित लाभार्थींना मार्गदर्शन केले.
२५ यवत वाटप
भाग्यश्री योजनेमधील लाभार्थींना मुदत ठेव पावती वाटप करताना सयाजी ताकवने , गौरी लडकत.