त्यामध्ये १५०० सॅनिटायझर बाटल्या व १५०० मास्क दिले तर प्रभा इंजिनियरिंग प्रा. लि.च्या वतीने कोरोना प्रादुर्भाव काळात जीवाची बाजी लावून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, व सेविका यांना कोरोना सुरक्षित किट वाटप करण्यात आले.
यावेळी लुपिन फाउंडेशनचे आधिकारी शैलेश वैद्य, योगेश धावडे, डॉ. सावबा शिंदे, रूपेश सावंत, तर प्रभा कंपनीचे अविनाश आडमुठे, अविनाश बनगर, किरण शेळके हजर होते. प्रसंगी शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, संतोष गोडाबे, नवनाथ भेगडे, वैशाली कुंभार, सोनाली मातेरे, निकिता घोगरे माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे, युवा उद्योजक संतोष गोडाबे, संदीप कुंभार, मयूर घोगरे उपस्थित होते, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी दिली.