या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती भोरच्या अश्विनी सोनवणे (केळकर) विस्तार अधिकरी संजय रुईकर, जगन्नाथ सोनवणे व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व स्मार्ट टीव्ही उद्घाटनाने झाली. शाळा चालू झाल्यानंतर मुलांना सॅनिटायझर हातावर घेणे सोईस्कर होईल. या हेतूने सॅनिटायझर स्टॅन्ड जिल्हा परिषद शाळांना वाटप करण्यात आले. विठ्ठल आवाळे यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांच्या कामांचा आढावा सादर केला. पुढीलप्रसंगी सदैव शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची कामे त्यांच्या अडीअडचणी प्रसंगी पाठीशी उभे राहण्याचे आश्वासने दिली.
गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी बिसा कार्यक्रम, स्वानंदी शिक्षण, व्हिजन भोर, ऑनलाइन-ऑफलाइन अभ्यासक्रम, स्वाध्याय कार्ड व भावी योजना यांबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लोहोकरे, अनिता नागेश यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक जगताप मनोज लक्ष्मण यांनी मानले.
फोटो: सॅनिटायझर स्टॅन्ड व टीव्ही वाटप जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे.
छाया