‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर प्रमुख पाहुण्या होत्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितीन भास्कर, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनिता हिवरकर, साईवेद फार्माचे संचालक डॉ. जालिंदर देशमुख, वीर बॅक्वेट हॉलचे दत्तानाना रायकर, संगणक योगेश यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हायब्रंट फाउंडेशनच्या अश्विनी जाधव यांनी प्रास्ताविक केले.
व्हायब्रंट फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत विजय बाविस्कर यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. आर.जे. बंड्या यांनी सूत्रसंचालन केले.
अवंती दामले, सपना काकडे, सोनाली घारे, पीयू कोसुम्बकर, प्रांजल जाधव, प्रीती मेघराज मोरे, कृपा कुलकर्णी, संध्या भोईर, श्रेया शिंदे, ऋतिका पाटील, पूर्वा पारनेरकर, रोहिणी हाके, भारती बलकवडे, योगीता वरगडे, स्वाती देशमुख, संगीता तरडे, शीतल रासकर, वैशाली पाटील, वृषाली तुपे, कोविड वीरांगना पुरस्कार भाग्यश्री चव्हाण, सुनीता डांगे, शिल्पा यादव, राजश्री खिलारे, स्नेहल पवार, प्रतिभा वेताळ यांचा सन्मान करण्यात आला. मॅगझिन कव्हर पेज पुरस्कार शीतल रासकर, संध्या भोईर, संगीता माळी यांना प्रदान करण्यात आला. दीपक नाईक, पीयूषा गायकवाड, धनश्री शर्मा, किरण सोनी, सुरेखा मधे, अंजली देशमुख यांनी संयोजन केले. सुनंदा पै यांच्या शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.