बारवकर यांनी आपल्या आदेशात लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पेरणे गावी जयस्तंभ मानवंदना कार्यक्रमा दरम्यान दोन गटांत जातीय दंगल होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सार्वजनिक शांतता भंग होऊन दंगा होऊ नये यासाठी व या कालावधीमध्ये अशा अवैध कृत्यांपासून मानवंदना कार्यक्रमास बाधा येऊ नये हा मुख्य उद्देश आहे. या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक यादीतील नमुद इसम हे मौजे पेरणे जयस्तंभ परिसरात आलेस ते दलित समाजाच्या भावनांना चिथावणी देवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची व सार्वजनिक शांतता भंग करण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली यांनी हवेली प्रांत अधिकारी यांच्या सादर केला आहे.
त्यानुसार सचिन बारवकर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अधिकारानुसार यादीतील नमुद 77 इसम यांना संपुर्ण पुणे जिल्ह्यात 30 डिसेंबर व 2 जानेवारी दरम्यान सकाळी ०६.०० वा पर्यंत प्रवेश करण्यास, वास्तव्य करणेस मनाई करीत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहिल, असे देखील आदेशात म्हटले आहे.