पुणे : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीनिवडणूक आता पुन्हा लांबणीवर पडणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे कार्यक्रम उच्च न्यायालयाचे पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नयेत असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या आदेशामुळे जिल्हा बँकांच्या निवडणुका आणखी पुढे गेल्या आहेत.
जिल्हा बँकांच्या निवडणुकांसाठी मतदार प्रतिनिधींचे सोसायट्यांमध्ये झालेले ठराव तसेच अनेक सोसायट्यांच्या मतदार प्रतिनिधी चे नाव मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही. तसेच अन्य बाबींवर हरकत घेत जिल्हा बँकांच्या निवडणुकी संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर आज सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय घोषित होत नाही तोपर्यंत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आहे पुणे ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्हा बॅंकांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करू नये असे आदेश दिले.