बारामती : एका विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाराच्या आधारे जास्तची जमीन दाखवून तब्बल ८५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन जिल्हा बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील करंजे येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.या कर्जाद्वारे अनेकजण गब्बर झाले आहेत. अनेकांनी आलिशान गाड्या, बंगले, सोने खरेदी केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सोमेश्वरनगर शाखेत भेट देऊन माहिती घेतली आहे. संबंधीत कर्जदारांच्या जमिनींचा लिलाव करून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.या अगोदरही निंबूत येथील सोमेश्वर विकास सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाºयाद्वारे तब्बल २२ कोटींच्याही वर कर्ज घेऊन जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरणही राज्यात बरेच गाजले होते. त्यानंतर वाघळवाडी येथील सोसायटीमध्येही ५२ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. आता पुन्हा नव्याने हा घोटाळा समोर आल्याने सोमेश्वरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.या घोटाळ्यात अनेकांचे लागेबांधे असूनही हे प्रकरण परस्पर दाबले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अधिकाºयांनी नुकतीच सोमेश्वर शाखेला भेट दिली आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.कडक उपाययोजना त्वरित करण्याची गरजपुणे जिल्हा बँकेत सोमेश्वर शाखेत याअगोदरही बनावट सातबाºयाच्या आधारे करोडो रुपयांची फसवणूक होऊनही नव्याने पुन्हा ८५ लाख रुपयांची कर्ज प्रकरणाद्वारे फसवणूक झाली असल्याने जिल्हा बँकेच्या सोमेश्वर शाखेला भ्रष्टाचाराची कीडच लागली असल्याचे स्पष्ट आहे. याला आळा घालण्यासाठी त्वरित कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा अजूनही मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा बँक सोमेश्वरनगर शाखा ८५ लाखांची फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:13 AM