पुणे, दि. 15 - स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री, शंकरराव जाधव, मोनिका सिंग, दिनेश भालेदार, ज्योती कदम, महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यासहीत देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सीवूड ते बेलापूर -नवी मुंबई मनपाकार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली.
नाशिकमध्ये वडाळा गाव येथे जामा गौसिया मशिदीसमोरही स्वातंत्र्यदिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. मशिदीचे मुख्य इमाम धर्मगुरु मौलाना जुनेद आलम यांनी ध्वजारोहण केले. तर मदरसा गौसिया फैझान -ए-मदारमधील विदयार्थ्यांनी राष्ट्रीयध्वजाला सलामी दिली. यावेळी देशाच्या एकता, प्रगती आणि संरक्षणासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.