पुणे : जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा मोहिमेला गती देण्यासाठी जिल्ह्यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना त्यांचा गट हगणदरीमुक्त झाल्याने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शासनाने या वर्षी दहा जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरवले असून, यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्या दृष्टीने काम सुरू केले असून, गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असले, तर ३० सप्टेंबरपर्यंतच ते टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते ज्या सदस्यांनी गट हगणदरीमुक्त केला आहे, त्यांचा मानपत्र देऊन समन्मान करण्यात आला. यात मुळशी तालुका १00 टक्के हगणदरीमुक्त झाला असून, येथील तत्कालीन सभापती बाबा खंदारे, पिरंगुट कासार आंबोली गटाचे सदस्य शांताराम इंगवले, मान हिंजवडी गटाच्या स्वाती हुलावळे, प्रौैढ आंबवणे गटाच्या शिल्पा ठोंबरे तर भोर तालुक्यातील वेळू नसरापूर गटाचे कुलदीप कोंडे व कारी खानापूर गटाच्या गीता आंबवणे हवेलीतील दशरथ काळभोर यांना मानपत्र देण्यात आले. या वेळी प्रदीप कंद यांनी या सदस्यांचे अभिनंदन करून, आता आपण सर्वच सदस्यांना आपआपला गट निर्मल करण्यासाठी उद्यापासूनच कामाला लागले पाहिजे. काहीही झालं तर आपल्या काळात गट निर्मल झालाच पाहिजे हे ध्येय ठेवून कामला लागा, असे आवाहन सदस्यांनाकेले. इंदापूरला खूप काम करायचे आहे, अशी खंत व्यक्त करून राजकारण बाजूला ठेवा असा सल्ला दिला. आता तेथील आमदार व माजी मंत्री यांनीही हगणदरीमुक्तीचे मनावर घेतले असून, इंदापूरही मागे राहणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला. (प्रतिनिधी)