लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्यावतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत संतोष चौहान याच्या अर्धशतकी खेळीसह आर्यन यादव, श्रीप्रसाद कुलकर्णी यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाचा १८ धावांनी पराभव करत विजेतेपद मिळवले.
भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने २५ षटकात ११५ धावा केल्या. यात सलामवीर संतोष चौहान याने नाबाद ६९ धावांची खेळी करून संघाला महत्वपूर्ण धावसंख्या उभारून दिली. पीवायसी संघाकडून हर्षल पासलकर, अर्जुन चेपे, यश अधिकारी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दिवेकर क्रिकेट अकादमी संघाला रोखले.
आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघ २१.३ षटकात ९७ धावांवर बाद झाला. दिवेकर क्रिकेट अकादमीकडून आर्यन यादव (३-१८), श्रीप्रसाद कुलकर्णी (३-१४), ओमकार रसाळ (२-२१), आदित्य कापरे(१-२२) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाच्या विजयात वाटा उचलला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मानस लेकचे मालक अतुल इंगवले आणि मंदार भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक अगरवाल आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम फेरी :
दिवेकर क्रिकेट अकादमी : २५ षटकांत सर्वबाद ११५ धावा, संतोष चौहान नाबाद ६९, आदित्य साळुंखे १०, आर्यन यादव १३, हर्षल पासलकर ४-१४, अर्जुन चेपे २-१४, यश अधिकारी १-९ वि.वि. पीवायसी हिंदू जिमखाना अ : २१.३ षटकात सर्वबाद ९७ धावा, यश अधिकारी २३, अर्जुन चेपे १७, वेदांत देव्हाडे १५, शौनक राजे १२, आर्यन यादव ३-१८, श्रीप्रसाद कुलकर्णी ३-१४, ओमकार रसाळ २-२१, आदित्य कापरे १-२२; सामनावीर - संतोष चौहान; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ १८ धावांनी विजयी.
चौकट
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
फलंदाज : संतोष चौहान, दिवेकर क्रिकेट अकादमी, १६३ धावा
गोलंदाज : आर्यन यादव, दिवेकर क्रिकेट अकादमी, १४ बळी
मालिकावीर : आर्यन यादव, दिवेकर क्रिकेट अकादमी,
क्षेत्ररक्षक : क्षितिज पाटील, दिवेकर क्रिकेट अकादमी, ४ झेल, २ धावचीत