पुणे : हवाई दलाच्या एन ३२ विमानातून तब्बल ८ हजार तसेच १२०० फुटावरून उडी मारत लष्कराच्या पॅराट्रूपर्स, निवृत्त अधिकारी तसेच हवाई दलाच्या आकाश गंगा पथकाच्या जंपर्सनी दिघी येथील बॉम्बे सॅपर्सच्या ट्रेनिंग बटालीयन येथे चित्तथरारक कवायाती केल्या. हवेत ४ हजार फुटांवर थ्री फॉरमेशन, टु फॉरमेशन करत या जवानांनी उपस्थितांच्या अंगावर शहारा आणला. बॉम्बे सॅपर्स ग्रुपच्या १९८वा वर्धापनदिन तसेच बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या रियुनियननिमित्त दिघी येथील ट्रेनिंग बटालियन येथे मंगळवारी ‘पॅरा डिस्ले’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्कराचे तसेच हवाई दलाच्या ६९ स्काय स्काय डायव्हर्सनी ८ हजार तसेच १२०० फुटांवरून एन ३२ या विमानातून उड्या मारून या कवायती सादर केल्या. यावेळी पुण्यातील मिलीटरी इंजीनिअरींग विद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल म्यॅथ्यूज, बॉम्बे सॅपर्सचे प्रमुख ब्रिगेडिअर धीरज मोहन यावेळी उपस्थित होते. जिम्नॅशियम आणि सुपर योगाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर ४ जवानांच्या तुकडीने विमानातून १२०० फुटांवरून उड्या मारल्या. कार्यक्रमानंतर सर्व पॅराट्रूपर्सनी संचलन केले. यानंतर लेफ्टनंट जनरल म्यॅथ्यूज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर धिरज मोहन म्हणाले, बॉम्बे सॅपर्स ग्रुपला मोठा इतिहास आहे. दर ४ वर्षानंतर देशभरातील सॅपर्स मधील आजी आणि माजी अधिकारी आणि जवान एकत्र येत रियुनियन साजरे करतात. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सॅपर्सच्या फोर इलेव्हन पॅराशुट कंपनी आणि लष्कराच्या ५० फॅरा फोर्सच्या जवानांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. याबरोबरच सॅपर्स जवानांना विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षकण देण्यात आहे. या साठी स्पोर्ट आॅथोरिटी आॅफ इंडियाचे सहकार्य मिळत आहे.
पॅराट्रूपर्सच्या जलद हालचाली अतिशय जलद हालचाली करत कुठल्याही परिस्थितीत शत्रुच्या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी पॅराट्रूपर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अतिशय जोखमी आणि धाडसी असे जवान पॅराट्रूपर्स होऊ शकतात. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पॅराट्रूपर्सनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.
संचलन सोहळाबॉम्बे सॅपर्स ग्रुपच्या १९८ वा वर्धापनदिन तसेच बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रियुनियननिमित्त खडकी येथील सॅपर्सच्या सेंटरमधील परेड ग्राउंडवर जवानांचा संचलन सोहळा पार पडणार आहे. या वेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच निवृत्त सैनिकही या वेळी उपस्थित राहणार असल्याचे ब्रिगेडियर धीरज मोहन म्हणाले.