पुणे: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे शाखेत शहराध्यक्षपदावरून फूट पडली. रविवारी शहराध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात पराभूत झालेल्या गटाने विजयी झालेल्या गटावर दिशाभूल केल्याचा आरोप करत नव्या शहराध्यक्षांची निवड केली. आता हे दोन्ही गट १६ जुलैला पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेणार आहेत.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सोनाली लांडगे, फर्जाना शेख व सनिता वाडेकर हे चार नगरसेवक व निवडणूक जिंकलेले अशोक कांबळे आणि त्यांचे समर्थक असे एका बाजूला व हिमानी कांबळे या एकमेव नगरसेवक व त्यांच्याबरोबर माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे व त्यांचे सहकारी दुसºया बाजूला अशी सध्या पुणे शहर रिपाईची अवस्था झाली आहे. रविवारी या पक्षाची शहराध्यक्षपदासाठी निवड झाली. एकूण २ हजार ९६८ क्रियाशील सदस्य मतदान करणार होते. त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान चालले. पक्षाने एम. डी. शेवाळे यांनी निरीक्षक म्हणून पाठवले होते. २ हजार १३८ जणांनी मतदान केले. त्यात अशोक कांबळे यांना सर्वाधिक म्हणजे ९९६ मते मिळाली. एम. डी. शेवाळे यांनी त्यांना विजयी घोषीत केले. या निवडणूक प्रक्रियेचे खुद्ध आठवले यांनी कौतूक केले व राज्यात सर्व ठिकाणी याच पद्धतीने निवडी करण्यात येतील असे जाहीर केले.दरम्यान पराभूत उमेदवारांपैकी काहींनी एकत्र येत निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली असल्याची टीका जाहीरपणे केली. त्यांनी महेंद्र कांबळे यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केले. नगरसेवक हिमानी कांबळे त्यांच्यासमवेत आहेत. दुसरीकडे उपमहापौर डॉ. धेंडे यांनी अशोक कांबळे हेच श्हराध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. कांबळे यांनीही निवडणूक योग्य पद्धतीने झाली, त्यात काहीही चुकीचे झालेले नाही, पराभूत झालेले व वेगळा गट स्थापन करू पाहणारेही आमचेच आहेत, त्यांना बरोबर घेऊनच काम करू असे सांगितले.
शहराध्यक्षपदावरून आरपीआयमध्ये फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 8:35 PM
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे शाखेत शहराध्यक्षपदावरून फूट पडली. रविवारी झालेल्या शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाने विजयी झालेल्या गटावर दिशाभूल केल्याचा आरोप करत नव्या शहराध्यक्षांची निवड केली.
ठळक मुद्देदोन गटांचे दोन शहराध्यक्ष: ५ नगरसेवकांमध्येही गटदोन्ही गट १६ जुलैला पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेणार