शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

एजंट नेमून कर्जदारांची छळवणूक करू नका: विभागीय आयुक्तांचा बँकांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 5:33 PM

कोणत्याही प्रकारे कर्जदारांची मानसिक आणि शारीरिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांना सूचना

पिंपरी : कर्ज वसुलीसाठी बँकांनी वसुली एजंट नेमून कर्जदारांची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करू नये. वसुलीसाठी अवैध मार्गाचा वापर न करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. 

कोरोनाचा (कोविड१९) प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन (टाळेबंदी) जाहीर केली. टाळेबंदीच्या उपाय योजनांमध्ये जिल्हाबंदी होती. तसेच अनेक व्यवसायांवर निर्बंध आले. परिणामी या काळात छोटे मोठे उद्योग, शेतीचे जोड धंदे आणि इतर सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे अनेक व्यवसाय आर्थिक संकटात आले. अनेकांचा रोजगार गेला.कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाळेबंदी काळात कर्ज वसुलीला स्थगिती दिली होती. बँकांनी कर्ज वसुली करणे हे न्यायसंगतच आहे. मात्र काही बँका सक्तीची वसुली करीत असून, कर्जासाठी तगादा लावत आहेत. बाळाचा वापर करून आणि धमकी देऊन कर्ज वसुली सुरू आहे. त्या साठी वसुली एजंट नेमण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँक, सहकारी बँका, वित्तीय संस्था,  जिल्हा बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबत उपाययोजना कराव्यात. कोणत्याही प्रकारे कर्जदारांची मानसिक आणि शारीरिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अवैध प्रकारे कर्ज वसूली होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना विभागीय आयुक्त राव यांनी केली आहे. --------विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आवाहनाला बँकिंग क्षेत्र नक्कीच प्रतिसाद देईल. कर्ज वसुलीत घट झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) निकष पाळण्यात अपयशी ठरल्यास प्रशासनाने आरबीआयकडून होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आरबीआयकडे योग्य ते प्रयत्न केले पाहिजे.विद्याधर अनास्कर, अध्यक्ष नागरी सहकारी बँक महासंघ

टॅग्स :PuneपुणेbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याSaurabh Raoसौरभ राव