अतुल चिंचली
पुणे: समाजात दिव्यांग (मूकबधिर) मुलांना रोजगार मिळवणे कठीण असते. या मुलांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांना रोजगार मिळवताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. या मुलांना रोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर होण्याचीसंधी आदिवासी विकास प्रबोधिनी या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
वारजे येथे क्रिएटिव्ह पीपल प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विकास प्रबोधिनी ही संस्था हे सामाजिक कार्य करत आहे. या संस्थेत शिक्षण प्रसारक मंडळींची रुईया मूकबधिर शाळेतील ८ मुले व ६ मुली आहेत. संस्थेने सुरुवातीला एक वर्षभर मुलांना व मुलींना प्रशिक्षण दिले. नंतर ते शिकून झाल्यावर त्यांना रोजगार देण्यास सुरुवात केली.वस्तंूमधील वैविध्यगणपती व दिवाळी या सणासाठी गणपतीची मखर, कागदी फुले, सजावटीच्या वस्तू, रांगोळी, तर दिवाळीत पणत्या, आकाशकंदील, अशा वस्तू तयार केल्या जातात. शोभेच्या वस्तूंमध्ये काही लाकडी वस्तू, ट्रॉफी, टायरपासून टेबल - खुर्ची, फ्रेमस, उपहारात्मक वस्तू या सर्व ही मुले मुली तयार करतात.सकाळी १० ते ६ या वेळेत हे काम करत असतात. रोजगाराच्या दृष्टीने सर्व मुलांना सुरुवातीला ३००० रुपये प्रतिमाहिना दिला जात असे. आता सर्वांना त्यांच्या कामानुसार पगार दिला जातो.सर्व मुले कात्रज, हडपसर, सोमवार पेठ, कर्वेनगर, कोथरूड अशा भागातून येतात. संस्था त्यांची घरापासून ते संस्थेपर्यंत प्रवासाची जबाबदारी घेते.याशिवाय मोकळ्या वेळेत मुलांना इंग्रजी भाषा शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर कटिंग करणे, एम्ब्रॉयडरी करणे, संगणक चालवणे, मशीन चालवणे, शिवणकाम करणे या गोष्टी शिकवल्या जातात. सर्वांमध्ये काहींना केक आणि चॉकलेट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.संस्थेद्वारे रोजगार मिळवून देण्याबरोबरच व्यावहारिक, आर्थिक व सामाजिक ज्ञान मिळवून देते. गणपती, दिवाळी, अशा सणांना हे सर्व मनापासून काम करतात. सतत कामात व्यस्त असले तरी वेळेची चिंता न करता ही मुले काम करत असतात. हे समाजकार्य करण्यासाठी समाजकार्य पदवीधर अजिंक्य खारतोडे, वैभव मारकड, महानंदा बोधनकर यांचे सहकार्य लाभले आहे.- शिरीजा ठाकूर, संस्था संचालक, आदिवासी विकास
सुरुवातीला सर्वांना रोजगार दिला जात होता. या रोजगाराची बचत होण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्वांसाठी बँक खाते उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र काढून दिली आहेत. सर्वांच्या मनोरंजनासाठी महिन्याला प्रत्येकाचे वाढदिवस साजरे केले जातात. वर्षांतून एकदा ट्रिपचे आयोजनही केले जाते. तीन महिन्यातून एकदा पालकसभा घेलती जाते. मुलामुलींचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलच्या व्हिडिओ कॉलिंगचा वापर करतात.