शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दिव्यांगांचा अनुशेष अजूनही ‘शेष’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:10 AM

सरकारी नोकऱ्यांमध्ये घाऊक भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या रोजगारभरतीचा अनुशेष भरून काढणे अद्यापही सरकारला शक्य झालेले नाही. राज्यातील साडेसहा हजार दिव्यांगांच्या पदांचा अनुशेष शिल्लक असल्याचे अपंगकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षापासून दिव्यांग अनुशेषाची सुधारित आकडेवारीदेखील तयार करण्यात आलेली नाही.

- विशाल शिर्केपुणे : सरकारी नोकऱ्यांमध्ये घाऊक भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या रोजगारभरतीचा अनुशेष भरून काढणे अद्यापही सरकारला शक्य झालेले नाही. राज्यातील साडेसहा हजार दिव्यांगांच्या पदांचा अनुशेष शिल्लक असल्याचे अपंगकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षापासून दिव्यांग अनुशेषाची सुधारित आकडेवारीदेखील तयार करण्यात आलेली नाही.केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५च्या तरतुदीनुसार प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी संस्थेमध्ये दिव्यांगांना पदभरतीच्या ३ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार अंध व क्षीण दृष्टी, कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा प्रवर्गांसाठी १७ हजार ९१९ जागा होत्या. त्यांतील ११ हजार ४३३ पदे १ जानेवारी २०१७अखेरीस भरली गेली आहेत. त्यात अंध व क्षीण दृष्टीची २ हजार ७७१, कर्णबधिर २ हजार९३७ आणि अस्थिव्यंगाची ५ हजार ७२५ पदे भरली गेली आहेत.अजूनही अंध व क्षीण दृष्टीसाठी २ हजार ८७५, कर्णबधिर २ हजार ६२४ आणि अस्थिव्यंगाच्या ९८७ अशा ६ हजार ४८६ जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ७२ हजार सरकारी नोकºयांमधील पदे भरणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या काही हजार पदांचा अनुशेष सरकारला भरता आलेला नाही.ग्रामविकास विभागातीलतृतीय व चतुर्थ श्रेणी पदे, वित्त, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य, कृषी, नगरविकास उच्च वतंत्र शिक्षण, सार्वजनिकबांधकाम विभाग अशा २७ विविध विभागांत दिव्यांगांचा पदभरतीचा अनुशेष शिल्लक आहे. केंद्रसरकारने २०१६ रोजी दिव्यांगांसाठी केलेल्या कायद्यानुसार पदभरतीत४ टक्के जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत.दिव्यांगांच्या २१ प्रवर्गांचा करावा लागणार विचारकेंद्र सरकारने २०१६ साली दिव्यांग व्यक्तींचे अधिकार (द राईट्स आॅफ पर्ससन्स विथ डिसअ‍ॅबिलिटीज्) या कायद्यानुसार हलचालीवर मर्यादा असलेल्या व्यक्ती, कुष्ठरोग, मेंदूचा बुटकेपणा, स्नायुची अक्षमता, अ‍ॅसिड हल्ला पिडित, अंधत्व, क्षीण दृष्टी, श्रवणदोष, वाचा दोष, अध्यन क्षमता, स्वमग्न, मतिमंदत्व, पार्किन्सन, चेतापेशीवरील आवरणे नष्ट होणे, जुनाट व्याधी, हिमोफिलिया, थॅलसिमिया, सिकलसेस आणि बहुविकलांग असे प्रवर्ग केले आहेत. त्यांना देखील पदभरतीत योग्य स्थान द्यावे लागेल. प्रवर्गांची संख्या वाढल्याने ४ टक्क्यानुसार पदभरतीत दिव्यांगांचे आरक्षण ठेवावे लागेल.दिव्यांगांच्या नवीन कायद्यानुसार अजूनही पदभरतीच्या आरक्षणात वाढ केलेली नाही. दिव्यांगांना विशेषत: कर्णबधिर व्यक्तींना उच्च शिक्षणाच्या संधी आणि सुविधा उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे, रोजागाराचा अनुशेष शिल्लक आहे. किमान जुन्या कायद्यानुसार रोजगाराचा अनुशेष लवकर भरला जावा.- हरिदास शिंदे, अध्यक्ष अपंग हक्क सुरक्षा समिती

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे