पुणे : दसरा आणि दिवाळीचे मुहूर्त साधून वाहने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार यंदा दिवाळीत नागरिकांनी दुचाकी खरेदीला अधिक पसंती दिली आहे. या वर्षी दसरा ते दिवाळी २० दिवसांत शहरात २२ हजार १७५ वाहनांची विक्री झाल्याची नाेंद आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २,४३७ वाहने अधिकची विकली गेली. यात दुचाकी १४,५४२; तर चारचाकी ५,१७५ वाहने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा पुणेकरांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना अधिक पसंती दिली आहे. यानुसार दि. २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात एकूण २२,१७५ वाहनांच्या विक्रीची नोंद झाली. महिनाभरापूर्वी वाहनांचे ॲडव्हान्स बुकिंग केले असले, तरी अनेक जण दिवाळीच्या मुहूर्तावरच वाहन घरी घेऊन जातात. यंदाही माेठ्या प्रमाणावर वाहने घरी आणली.
वाहनांची विक्री (२४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान)
दुचाकी : १४,५४२ चारचाकी : ५,१७५रिक्षा : १,०६३मालवाहतूक : ७३४बस : ८२टॅक्सी : ५७९ एकूण : २२,१७५