- संपादक : योजना यादव, पृष्ठे : १५८, मूल्य : ३०/-
साहित्य-लोभस
कथा, कविता, अध्यात्म, वैचारिक, कायदे विषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर आधारित भरगच्च साहित्याचा समावेश असलेला हा दिवाळी अंक. राजन खान, सुनिल माळी, विष्णू शिंदे, अनंत नाईक यांच्या वाचनीय कथा तर कोरोना संदर्भातील अनिष फणसळकर, अॅड. व्ही. पी. शिंदे, अक्षय पैठणकर पराग पोतदार, सुचित मुंदडा, अॅड. रोहित एरंडे यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. सोबत आनंद सराफ, उमेश पोकळे, नीलिमा वर्तक, शशिदा इनामदार, जयंत शिंदे आदींचा लेखन सहभाग उल्लेखनीय आहे. अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विभागात सतीश मुळीक, सुधाकरराव आव्हाड, एन. डी. पाटील, अच्युत कराड, अस्मिता धात्रक आदींनी भास्करराव आव्हाड यांच्या विषयी हृद्य अशा आठवणी जागविल्या आहेत.
- संपादक : जयंत शिंदे, पृष्ठे : १९६, मूल्य : १५०/-
मराठबोली
लोकशिक्षणाच्या हेतूने प्रकाशित हा दिवाळी अंक दर्जेदार साहित्य वाचकांसाठी घेऊन आला आहे. निवडक अभंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असामान्य कर्तृत्वाचा वेध घेणारे लेख, कवी इंद्रजित भालेराव, रमण रणदिवे, इलाही जमादार यांच्या कवितांवर गीतांजली जोशी, सुनेत्रा गायकवाड, ईशान संगमनेरकर यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत.अनिता पाध्ये यांचा मुघले आझम चित्रपट निर्मितीतील वैशिष्टये सांगणार्या लेखासोबतच रंजक व माहितीपूर्ण साहित्याने सजलेला अंक साहित्यप्रेमींसाठी पर्वणी आहे.
- संपादक : परमेश्वर प्रभुअप्पा उमरदंड, बुदोडकर, संपर्क : ९३२५५०९४५०, पृष्ठे : २०८, विनामूल्य