शहरं
Join us  
Trending Stories
1
मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
3
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
4
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
5
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
6
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
7
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
8
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
9
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
10
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
11
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
12
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
13
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
14
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
15
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
16
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
17
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
19
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
20
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

दिवाळी फराळ होणार गोड!!! डाळींच्या दरात निम्म्याने घट, तेलही घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 4:51 PM

तेल आणि रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ, चणाडाळीच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी फराळ अधिक गोड होणार आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन-चार दिवसांत फराळासाठी लागणार्‍या रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ आणि चणाडाळीच्या दरात मोठी घट झाली आहेतेलाची आवक चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे.जीएसटीमुळे बाजारात काही काळ मंदी होती. मात्र आता खरेदीला येणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली आहे.

पुणे : दिवाळी फराळासाठी लागणार्‍या रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ आणि चणाडाळीच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी फराळ अधिक गोड होणार आहे. तेल आणि इतर डाळींच्या किंमतीतही काहीशी घट झाली आहे.संपूर्ण राज्यात दिवाळी हा सण मोठ्या उत्सहात आणि आनंदात साजरा करतात. त्यामुळे या सणासाठी फराळाचे पदार्थही अधिक प्रमाणात घरोघरी तयार केले जातात. दिवाळीच्या काही दिवस आदी फराळाच्या पदार्थांना बाजारात मागणी वाढत असते. परंतु यंदा जीएसटीमुळे सर्वंच पदार्थांचे दर वाढल्याने ग्राहकांनी भुसार बाजाराकडे पाठ फिरवली होती. गेल्या तीन-चार दिवसांत फराळासाठी लागणार्‍या रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ आणि चणाडाळीच्या दरात मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांची भुसार बाजारात पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तेलाची आवक चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तेलाला मागणी वाढली, तरी दर स्थिर राहणार असल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली. विविध प्रकारच्या तांदळाची खरेदी ग्राहकांनी सुरु केली आहे. मात्र नोटाबंदी, जीएसटी, मंदी आदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी खरेदीला येणार्‍या ग्राहकांची संख्या कमी आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक क्षेत्रातील लोकांचे बोनस झाले नाहीत. त्याचा फटका काही प्रमाणात बसत आहे. मंदीमुळे खरेदीसाठी ग्राहकांनाही काही अडचणी येत असल्याचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. तर उत्पादन घटल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध होत नाही. साखरेच्या करातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात किलोमागे २ रुपयाची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विजय गुजराथी यांनी सांगितले. दिवाळीत रवा, मैदा, बेसन, भाजकी डाळ, पोहा आदीला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. जीएसटीमुळे बाजारात काही काळ मंदी होती. मात्र आता खरेदीला येणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली आहे. फराळासाठी लागणार्‍या बहुतांश वस्तूंच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी अधिक गोड होणार असल्याचे व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी सांगितले.

फराळासाठी लागणार्‍या वस्तूंचे तुलनात्मक दर (प्रति किलोमागे)

वस्तूचे नाव       सध्याचे दर              गतवर्षीचे दरबेसन                 ८० रुपये                    १४० रुपयेचनाडाळ            ७० रुपये                    १४० रुपयेभाजकी डाळ      ८५-९० रुपये              १६० रुपयेउडीदडाळ           ७० रुपये                    १८० रुपयेरवा                    २३ रुपये                    २३ रुपयेमैदा                   २१ रुपये                    २३ रुपयेसाखर                ३७-३८ रुपये              ३५-३६ रुपये

टॅग्स :diwaliदिवाळी