शेलपिंपळगाव : स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विष्णू नरहरी जोगमहाराज संस्थापित श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला हरिनाम गजरात सुरुवात झाली आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भाविकांची गर्दी होत असल्याने संपूर्ण अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. राज्यातून आलेले नागरिक तसेच भाविकभक्त या सोहळ्यात हरिनामाचा गजर करीत अलंकापुरीच्या वैभवात वाढ करीत आहेत. चाकण रस्त्यालगतच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याच्या प्रारंभाप्रसंगी व्यासपीठावर शांतिब्रह्म मारुतीमहाराज कुरेकर, मुखेकर शास्त्री बाबा, बोधेमहाराज, संदीपानमहाराज हासेगावकर, बंडातात्यामहाराज कराडकर, डॉ. लहवितकरमहाराज, पिंपरीचे महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदींसह संस्थेचे माजी विद्यार्थी साधक, प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगवादक, गायक, भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
अलंकापुरीत रंगला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
By admin | Published: March 25, 2017 3:36 AM